‘न्यू नॉर्मल’ गुंतवणूक नियम ..! भाग 1

 ‘न्यू नॉर्मल’ गुंतवणूक नियम ..!  भाग 1 

मागच्या सहा महिन्यात सर्वात जास्त ऐकू येत असलेला शब्द म्हणजे न्यू नॉर्मल. याचा थोडक्यात अर्थ असा की ज्या गोष्टी आपण फेब्रुवारी 2020 पर्यंत   अतिशय सहजपणे करत होतो त्या पैकी अनेक गोष्टी आता तितक्या सहजपणे करता येणार नाहीत. अनेक सवयी, पद्धती आणि नियम आता नव्याने स्वीकाराव्या लागणार आहेत. हीच गोष्ट आता गुंतवणुकीला देखील लागू होत आहे. माझ्या मते गुंतवणुकीला आता खालील न्यू नॉर्मल नियम योग्य ठरू शकतील.

            गुंतवणूक करताना आज पर्यंत सर्रास असा सल्ला दिला जात असे की गुंतवणूक करा आणि विसरून जा. म्हणजे लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करा. मात्र तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक राजकारण आणि  अर्थकारण  ह्या मुळे आता disruption फारच जलद गतीने येत आहेत. अनेक गोष्टी, तंत्रज्ञान फारच जलद गतीने कालबाह्य होत आहेत. त्यामुळे वेळोवेळी प्रॉफिट बुक करणे ही आता गुंतवणुकीसाठी काळाची  गरज झाली आहे. अनेक गुंतवणूकदार पैसे गुंतवताना खूपच  रिसर्च करतात मात्र  प्रॉफिट बुकिंग बाबत फारच कमी विचार करतात. त्यामुळे मार्केट कंडिशन चा पुरेपूर फायदा घेता येत नाही.

            गुंतवणुकीसाठी क्षेत्र किंवा सेक्टर निवडत असताना आता न्यू नॉर्मल चा विचार प्रामुख्याने करावा लागेल. आत्मनिर्भर भारत अभियान, भारत चीन संबंध, अमेरिका चीन संबंध, कोरोना नंतरचे अर्थकारण या सर्वांचा कोणत्या सेक्टर ला फायदा आणि कोणत्या सेक्टर ना नुकसान होऊ शकते याचा अंदाज घ्यावा लागेल. केमिकल, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, मेटल, आयटी  आणि गाड्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्यांसाठी  येणारा काळ अधिक चांगला असू शकेल. विमान कंपन्या, ट्रॅवल आणि टुरिजम कंपन्या, इन्फ्रा मधील कंपन्या, बँका आणि वित्तीय कंपन्या यांच्यासाठी येणारा काळ हा थोडासा काळजीचा राहील.

      दहा फुट उंचीवरुन खाली सोडलेला चेंडू जसा 4-5 फुट वर उसळतो त्याच पध्दतीने सध्या मार्केट मध्ये तेजी चालू आहे. कोरोना मधून जसे सावरत जाऊ तसे झालेल्या नुकसानीचा अंदाज येईल आणि मार्केट मध्ये थोडी मंदी येऊ शकते. ती कधी येईल हे येणारा काळच ठरवेल. सावध तो सुखी.    

 


Comments