‘न्यू नॉर्मल’ गुंतवणूक नियम ..! भाग 1
‘न्यू नॉर्मल’ गुंतवणूक नियम ..! भाग 1 मागच्या सहा महिन्यात सर्वात जास्त ऐकू येत असलेला शब्द म्हणजे न्यू नॉर्मल . याचा थोडक्यात अर्थ असा की ज्या गोष्टी आपण फेब्रुवारी 2020 पर्यंत अतिशय सहजपणे करत होतो त्या पैकी अनेक गोष्टी आता तितक्या सहजपणे करता येणार नाहीत . अनेक सवयी , पद्धती आणि नियम आता नव्याने स्वीकाराव्या लागणार आहेत . हीच गोष्ट आता गुंतवणुकीला देखील लागू होत आहे . माझ्या मते गुंतवणुकीला आता खालील न्यू नॉर्मल नियम योग्य ठरू शकतील . गुंतवणूक करताना आज पर्यंत सर्रास असा सल्ला दिला जात असे की गुंतवणूक करा आणि विसरून जा . म्हणजे लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करा . मात्र तंत्रज्ञानातील प्रगती , जागतिक राजकारण आणि अर्थकारण ह्या मुळे आता disruption फारच जलद गतीने येत आहेत . अनेक गोष्टी , तंत्रज्ञान फारच जलद गतीने कालबाह्य होत आहेत . त्यामुळे वेळोवेळी प्रॉफिट बुक करणे ही आ...